मुख्य पान
अमेरिका
युरोप
आशिया
ऑस्ट्रेलिया
आफ्रिका
व्हिडिओ गॅलरी

मुख्यपान » फीचर्स » बातम्या
 
487
 
12
 

β वाटणीने केले शेतीचे वाटोळे !
- जयंत महाजन
शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 03:30 AM IST

 

 
487
 
12
 

प्रतिक्रिया
राजीव - रविवार, 4 डिसेंबर 2016 - 08:41 AM IST
उत्तम लेख! शेती बद्दल अतिशय संवेदनशील लेखन. कोआपरेटिव शेती करता येईल का?
 
12
 
1
 

सुभाष भोराडे - रविवार, 4 डिसेंबर 2016 - 05:41 AM IST
शेतीचे च तुकडे झाले नाहीत तर आई वडील सुद्धा वाटले गेलेत मालक जमिनीचे प्ररंतू मुले सुना त्यांना विचारत नाहीत महातारपनी हि आवसत्ता सामाजिक नीतिमूल्ये किती घसरली आहेत , बऱ्याच शेतकरी विभक्त कुटुंबात पाहण्यास मिळत आहे ही खूप मोठी शोकांतिका आहे याचा विचार झालाच पाहिजे
 
11
 
1
 

abc - रविवार, 4 डिसेंबर 2016 - 04:26 AM IST
महाराष्ट्र राज्य औद्योगिक धोरण राबवताना शेतीची अतोनात हानी झाली.अश्या पद्धतीने शेती अधिग्रहित करून शेतीचा कणा मोडून पडला.आजही जमिनीवर नुसते कुंपण घालून कुठलीही औद्योगिक वापराशिवाय अनेक भूखंड पडून आहेत.(साधारण २०-३० वर्षे )शेतीची पद्धतशीर वाट लावण्यात आली.पाण्याचे असमान वाटप हि दुसरी मोठी समस्या.मराठवाडा आणि विदर्भातील शेतीची वाताहत त्यामुळे झालेली महाराष्ट्राने पहिले.ह्या सर्व मोठ्या कारणाने एक छोटे कारण घडले कि कुटुंब उध्वस्त झाली आणि एकमेव आधार असणाऱ्या शेतीचे तुकडे झाले.अजूनही सरकार ने शेती आणि खेडी स्वयंपूर्ण केली तर खूप फरक पडू शकतो
 
8
 
1
 

प्रदीप - रविवार, 4 डिसेंबर 2016 - 12:02 AM IST
एक काळ होता जेव्हा कुटुंब प्रमुख असायचा. आमच्या घरात आज्जी होती कुटुंब प्रमुख. सगळे जण कुटुंब प्रमुखाचे ऐकत असत. छोट्या कुरबुरी पासून मोठ्या वाद पर्यंत सगळ्या गोष्टी तिच्या पर्यंत येयुन थांबत असत. तिच्या शब्दाला सर्व मान देऊन गोष्टी मिटवत. आज प्रमुख राहिला नाही. तो सर्वांनां धरून ठेवणारा होता. बाकी हि बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत.
 
14
 
1
 

राजेश पाटील - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 10:43 PM IST
"छान विवेचन आहे ! पण हि शेती पुनः मिळविली पाहिजे! उदा. आपल्या बहुतेकांचे पूर्वज हे पश्चिम - उत्तर हिंदुस्थान मधून आक्रमणांमुळे दक्षिण भारतात आले. जे पूर्वीच्या काळी सोडावे लागले ते परत मिळविले पाहिजे! उदा. सिंध, तुटलेला बंगाल, पंजाब किंवा काश्मीर, स्वात, गांधार वगैरे प्रदेश पुनः: मिळविले तर प्रत्येक हिंदुस्थानी कडे दुप्पट जमीन असेल! " वरीलप्रमाणे असा उपाय कुणी सुचविला तर चालेल?
 
5
 
8
 

राहुल Chavan - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 10:04 PM IST
Agreed with JAYANT SAHEB
 
2
 
1
 

marutisabale - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 09:06 PM IST
छान लेख पण काहीतरी चंगळ
 
0
 
1
 

Ramesh - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 08:42 PM IST
अतिशय सुंदर लेखन ... आजचा शेतकरी दुष्टचक्रात अडकला आहे . . . सरकारचे धोरण शेतकरी हिताचे नाही . . . .
 
4
 
2
 

शांताराम गुंजाळ - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 08:24 PM IST
अतिशय अभ्यासपुर्ण लेख
 
4
 
1
 

अखिल - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 07:43 PM IST
संयुक्त कुटुंब पद्धती पुन्हा सुरु व्हावी हि आता काळाची गरज आहे!!
 
4
 
1
 

चंद्रकांत देशमुख - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 07:27 PM IST
एक वर्षांपूर्वी मी हाच विचार माझ्या चुलत भावाकडे मंडल होता. तो गावी शेती करतो आणि आम्ही मुंबई पुण्यात नोकरी करतो. शेतीची वाटणी झालेली आहे आणि सगळे आपल्यापरीने शेतीत प्रगती करायचा प्रयत्न करतायत. पण मला अजूनही वाटते कि वाटणी करून मोठ्यांनी अहंकार जोपासला पण आमच्यापरीने त्यात नुकसानच फार जाहले. शेती हा एकत्रित कुटुंबाने करायचा व्यवसाय आहे असे मला मनापासून वाटते.
 
15
 
1
 

Raja - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 05:05 PM IST
It is easier to criticise but difficult to do a self assessment. A simple question that begs an answer - why do we always divide and not grow what we have or what we can? We could have increased our land holding and then divided within our family avoiding a loss? We could teach our family and empower them? We could use the education and support to build a new fortune? Perhaps manage family size (population) to reduce straining our circumstances? Instead we complain about what we have and want to go back in time - abandoning what civilisation has achieved? Apologies for the contradictory tone but I agree we should really think about it and not just express populist sentiments. Also, sorry about responding in English - devnagri font not working at the moment. Respose correcting welcome.
 
0
 
0
 

datta - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 04:47 PM IST
सुंदर लेखन केले आहे तुम्ही , सत्य घटनांवर लेख, शेतीवरचे अवलंबत्व कमी करणे आवश्यक आहे, पाणी काटकसरणी वापरले पाहीजे , शेतकरी जगाला तरच , समाज, देश, प्रगती करेल, शेती जिवंत राहील, आणि नसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण हुईल , शेतकऱ्याची खूप हालाकीची परिस्थिती आहे , मुलांना शिक्षण देण्यास पेसा नाही , शेतकरयांची मुले तयामुळे शिकू शकत नाहीत. धरणातील पाणी उपसा कमी केला जावा, ठिबक सिंचन साठी अनुदान सर्व शेतकऱ्यांना दिन्यात यावी , तयामुळे पाण्याची बचत हुईल आणि सर्वांना - शेती , पिण्यासाठी , उद्योग साठी पाणी उपलभ हुईल
 
1
 
1
 

Nanasaheb - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 03:50 PM IST
हे खरे आहे कि एकत्रित कुटुंम्ब चांगली . परुंतु कारभारी चांगला असता तर विभक्ती होत नाही .दुसरे असे कि एक भाऊ नोकरी करत असेल तर , बाकीचे त्याचा पैशावर डोळा ठेऊन त्याला प्रॉब्लेम मध्ये आणता व शेतीचे काम करत नाही केले तर नेहमीचे उत्तर ; परवडत नाही , भाव नाही किंवा दुसऱ्याकडून उसने घेतले होते ते परत केले.विभक्त झाल्यानंतर गुंठा विकणे , संध्याकाळी ढाबा अँड एन्जॉय ......
 
8
 
1
 

jagannath - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 03:44 PM IST
vichar karayala lavnara lekh
 
0
 
1
 

अब्बास - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 02:56 PM IST
अगदी खरी परिस्थिती आहे पण त्यावर उपाय सुचवा तरच शेतकऱ्यांचे भले होईल .
 
3
 
2
 

Yogesh Patil. - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 02:26 PM IST
Its reality of the rural area .Thanks sir for writing on that topic... it's very sensitive subject of the rural area. all rural people have to attention on that thing's .....
 
2
 
1
 

मेघा गावडे - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 02:21 PM IST
अतिशय सद्य वस्तुस्थिती आहे. नक्कीच घरात सगळ्यांना वाचायला देणार.
 
3
 
2
 

सदैव - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 02:18 PM IST
दारू ,गुटखा ,तंबाकू ,मांसाहार हे सुद्धा एक भयंकर व्यसन आहे .आजचा तरुण शाकाहारी होणे म्हणजेच व्यसनमुक्ती खूप गरजेचे आहे .
 
5
 
3
 

अविनाश थोरात - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 02:09 PM IST
अतिशय उत्तम लेख अगदी वस्तुस्थितीला धरून.पण कमालजमीनधारणा कायद्याने न्याय शेतकरी कुटुंबाला दिला नाही हि वस्तुस्थिती लिहायला हवी होती.हाताची पाची बोटे सारखी असतात का?
 
2
 
2
 

नाना कड देशमुख - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 01:51 PM IST
लेखकाने लेखणीच्या रूपातून अचूक नेम धरून मारलेला तीक्ष्ण बाण, अगदी मर्मावर केलेला वार.एकत्र कुटुंब पद्धती सद्यस्थितीत मोडकळीस आली असून याला भोगवादी,चंगळवादी संस्कृतीहि तितकीच जबाबदार आहे.जे कुटुंब अजूनही एकत्र आहेत त्यातील प्रत्येकच व्यक्ती पैश्याने नसेल पण मनाने नक्कीच श्रीमंत आहेत.
 
5
 
1
 

माधव मुंडे - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 01:37 PM IST
एकदम खर आहे.लेखकाला माझा सलाम ,अगदी विभक्त कुटुंब पद्धती मुळे शेतकरी देशोधाडिला लागला आहे.
 
4
 
1
 

रॅम - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 01:15 PM IST
१०० % बरोबर पण आपण काळानुसार बदलले पाहिजे. ह्या अभ्यासातून ... मागे परत जाण्यापेक्षा, योग्य ती चूक सुधारून पुढे कसे जात येईल हे पहिले पाहिजे.
 
1
 
2
 

vidyadhar badve - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 01:05 PM IST
काही अंशी लेखकाने व्यक्त केलेल्या मताशी मी सहमत आहे. परंतु निव्वळ वाटणी झाली म्हणून शेतीची वाट लागली असे म्हणणे योग्य नाही . आज कमी क्षेत्र असूनही फायदेशीर शेती करणारे अनेक उदाहरणे आहेत. मुद्दा हा कि यशस्वी रित्या फायदेशीर व निरंतर शेती करण्यासाठी जे ज्ञान /माहिती पाहिजे त्याचा अभाव बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये दिसून येतो. दुसरा मुद्दा हा भांडवलाचा आहे. सरकारी योजना या कागदावर अत्यंत आकर्षक पद्धतीने मांडल्या जातात पण त्या प्रत्यक्षात आणताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. कागदपत्रे गोळा करण्यापासून , बँकेचे कर्ज मिळवण्यापयंत लाच दिल्याशिवाय प्रकरण पुढे जात नाही. शासनाच्या शेती विभागात काम करणारे अधिकारी हे गब्बर कसे होतात ? या प्रश्नाचे उत्तर कोणीच देत नाही. शेतमालास मिळणार भाव हा पण महत्वाचा प्रश्न आहे. बाजारात ६० रुपये किलोने मिळणार भाजीपाल्याचे शेतकऱ्याच्या हातात फक्त १० रुपयेच पडतात . कांद्याच्या बाबतीत तर गेल्यावर्षी शेतकरी रडकुंडीस आला. परंतु शेतकऱयाने पिकवले तरच आपण खाऊ शकू /जगू शकू हा विचार कोणी करत नाहीय. हीच खरी खंत आहे.
 
7
 
2
 

दीपक दिवटे - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 12:57 PM IST
पण चुलत काहीच धान्य देत नाही आजोबाच्या शेतीतला एक पोत तरी मिळायला नको का ? चुलत तेही देत नाही मागितला का भांडायला उठतो , मग शहर वासियांनी काय करायचे १० पोटातला १ पोत मिळत नाही मग वाटणी नाय मागणार तर काय मागणार
 
4
 
1
 

निलेश पाटील - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 12:39 PM IST
खरंय महाजन साहेब आपले निरीक्षण आणि आपल्या लेखातला एक न एक शब्द ! आज शेतकऱ्याची अवस्था आई(भूमाता ) जेऊ घालेना आणि बाप भीक मागू देई ना अशीच झाली आहे. आपण कितीही शास्त्र शुद्ध शेतीचे नियोजन इत्यादी गप्पा वातानुकूलित कक्षात बसून मारल्या तरी जे सध्या (आणि पिढीजात ) शेती करत आहेत त्यांच्या यातना हाल अपेष्टा यांची कल्पना करणेसुद्धा अवघड आहे. ही सर्व नियोजन करणारी बाबू लोक किंवा धोरण ठरविण्याची क्षमता असलेले राज्यकर्ते पण बहुतेक सर्व शेतकरी कुटुंबातूनच आलेले असतात तेव्हा त्यांना याची जाणीव नसते असे कसे म्हणता येईल. पण हे चित्र बदलायला दुसरे तिसरे कोणी नाही तर शेतकऱ्याला स्वतःला कंबर कसून कष्टाने आणि हिकमतीने हे चित्र बदलावे लागेल. काही तरुण शेतकरी पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन आशादायक कार्य करत आहेत त्यांच्या पाठीशी उभे राहूया आणि बदलत्या परिस्थितीला खंबीरपणे पण सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन सामोरे जाऊ या कारण Change is the only constant thing in this world.
 
2
 
1
 

राजू - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 12:22 PM IST
महाजन यांनी थोडक्या शब्दात सध्याच्या परिस्थितीचे नेमके वर्णन केले आहे . शहराकडे माणसांचे लोंढे येण्याचे खरे कारण अशा परिस्थितीमुळे आले आहे . एकत्र कुटुंब पद्धती आता आवश्यक झाली आहे , त्यासाठी अशा कुटुंबाला काहीतरी उत्पन्नांनाचा कायमस्वरूपी स्रोत करून दिला गेला पाहिजेल . शेती हे कष्टाचे उत्पन्न साधन आहे आणि मिळणाऱ्या उत्पन्नाला योग्य भाव मिळाल्यास पुन्हा असे एकत्र कुटुंबाचे स्वप्न साकार होऊ शकेल . अपुरा पॆसा आणि कष्टाच्या मानाने मिळणार मोबदला हे एक कारण नष्ट करता आल्यास शेतीला पुन्हा सुगीचे दिवस येतील . तसेच शहरात मिळणाऱ्या सुविधा खेड्यात मिळाल्यास तरुण वर्ग हमखास शेतीकडे वळेल यात शंका नाही . सुंदर लेख .
 
2
 
1
 

महेश पाटोळे, कृषी आयुक्तालय, पुणे - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 12:09 PM IST
अगदी बरोबर आहे, अंतर्गत राजकारण, आत्मकेंद्रित विचारसरणी, सुखलोलुप वृत्ती, स्वार्थ, शेती करतांना सेंद्रिय पद्धतीचा तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव यामुळे आज शेतीची हि अवस्था झाली आहे.
 
2
 
1
 

सुहास देशपांडे - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 12:07 PM IST
खूप मोठे नुकसान होत आहे. पण सांगणारेही राहिले नाहीत आणि ऐकणारे समजण्याच्या पलीकडे.
 
3
 
0
 

Prasanna Waichal - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 12:06 PM IST
To, The Editor and author, I do agree with the views of the author. It's not only for the farmers but in general, for the entire society, the established "combined family" was way better, way better than today's disintegrated families. Resources were shared, personal egos and differences of opinions were managed by the elders and olders alike. And forget about the lands back in the village, even today's houses are divided with individual TV channels, iPads and WiFi. After all its the "paschimatya sanskriti", everybody wants freedom, (read as free dome instead of bore-dome)! But dear author saheb, hang on there, its about to change. I was just reading a news from the American Geophysical Union that scientists in the US are thinking to combine the rock testing efforts into a single national facility. Again an effort of sharing common resources! Tawa bagha, hikadabi ekatra kutumb whayala yel lagayacha nhayee! I appreciate your article and thanks to Sakal for publishing this wonderful insight.
 
1
 
0
 

mukunda - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 11:54 AM IST
अगोदरची संयुक्त कुटुंब पद्धतीचं चांगली होती .कारण आता विभक्त कुटुंब पद्धतीमुळे शेतकर्याचे फार मोठे नुकसान झाले आहे.
 
0
 
1
 

चैतन्य कुलकर्णी - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 11:40 AM IST
अतिशय उत्तम लेख आहे जयंतजी. या लेखा मधून सत्य परिस्थिती कथन केलं आहे तुम्ही. मी स्वतः एका खेडे गावामध्ये राहिलेलो आहे. आजोबांच्या काळामध्ये शेती खूप जोमात होती . पण त्यानंतर शेतीच्या वाटण्या झाल्या. घरातील सगळी मुलं शिक्षण आणि नोकरी साठी पुण्यात आली. आम्हाला शेतीची आवड आहे पण शहरात आल्यामुळं नोकरी आणि शेती दोन्ही बघता येत नाही. याची खूप खंत वाटते .
 
4
 
1
 

bgg - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 11:38 AM IST
विभागवार दुखण वेगळच आहे. कोकणात लोक जमिनी विकूू लागले. कारण पारंपारीक पध्‍दतीने शेती परवडेना. अधुनीक पध्‍दतीने शेती करावी म्‍हटल्‍यास रस्‍त्‍यालगतचे शेतकरी आतील शेतक-यांना अवजारे किंवा टॅक्‍टर जाण्‍या येण्‍यासाठी रस्‍तेच देत नाही. तर ते शेती करणार कसे. रस्‍ते हीच खरी समस्‍या आहे. त्‍यावर कायदा होणे गरजेचे आहे. शेवटी शेती ओसाड टाकण्‍याशिवाय पर्यायच नाही.
 
1
 
1
 

Dipak - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 11:35 AM IST
अप्रतिम लेख
 
1
 
1
 

आनंद - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 11:25 AM IST
कालच सुलभा ब्रह्मे निरवर्तल्या. त्यांना श्रद्धांजली. त्यांनी एक लोकायत म्हणून संस्था चालू केली आहे. सध्याच्या आर्थिक धोरणात लहान माणसाला टिकून राहायचं असेल तर प्रामाणिक पणे एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी सामूहिक सहकारी शेती चळवळ, सहकारी ग्राहक चळवळ या दोन्ही गोष्टी सुरु करून त्यांच्यात थेट संबंध प्रस्थापित करणे. हेच वरील समस्येवरील उत्तर आहे. बांधावरचा शेजारी आपला प्रतिस्पर्धी नसून भागीदार आहे ही भावना तयार झाली तरच लहान शेतकरी प्रगती करेल. हे सर्व सुलभा ब्रह्मेंचं विचार आहेत. पुन्हा एकदा सुलभा ब्रह्मेंना श्रद्धांजली.
 
0
 
0
 

रप - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 11:24 AM IST
@जयंत महाजन ....हा जो लेख तुम्ही लिहिलंय अतिशय उत्तम आहे...अचूक आणि प्रत्येक गोष्टीचा विचार आणि निरीक्षण तुम्ही केलाय ....खरंच खूप छान लेख...आणि जे काही लिहिलंय ते तर खरंच आहे...आज जे काही शेतकरी भोघतो आहे ते वाटणी मुळेच झालाय...नैसर्गिक आपत्ती पण कारणीभूत आहेत पण जर एकत्र शेती पद्धती असेल तर त्यावर पण मात होऊ शकते...
 
1
 
1
 

प्रकाश - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 11:16 AM IST
खरी परिस्थिती आहे .......
 
0
 
1
 

स राजे - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 11:13 AM IST
अभिनंदन .शेतीसारखा १८ ते २० तास राबणारा धंदा शेतकऱ्याला उपाशी पोटी ठेऊ लागला ,आत्महत्या करू लागला ,सत्तेवर कोणीहो येउद्या शेतकऱ्याला वाली कोणीच नाही सगळे भांडवलदारांचे पूजक .अत्यंत सर्वांगसुंदर लेख .परत एकदा अभिनंदन .
 
3
 
2
 

जोशी रविंद्र - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 11:06 AM IST
लेख खुप सूदंर आहे जास्त शेती असली की ती खुप परवडते पाणी पण कमी लागते ठीबकचा खर्च कमी लागतो
 
1
 
1
 

देविदास कापसे जालना - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 10:51 AM IST
लेख खूप आवडला जयंत महाजन सर खूप वास्तववादी लेख आहे ग्रामीण जीवनातली खरीखुरी परिस्थिती आपण मंडली आहे आता पाच एकारवाला मोठा शेतकरी समजला जातो . शेती कमी असल्याने भागत नाही आणि शहरात जाऊन कामधंदा केला तर पोट तर भरते पण प्रगती काहीच होत नाही धरले तर चावते अन सोडले तर पाळते अशी गत झाली शेतीची. सरकार विचारवंत आणि समाजसुधारक यांनी यावर मार्ग सुचवलं पाहिजे . शेतकऱ्यांचे प्रोबोधन झाले पाहिजे तरच शेती आणि शेतकरी जगेल
 
4
 
1
 

जगन्नाथ जयराम सोनावणे - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 10:50 AM IST
समाजाचे आणि शेतकऱ्याचे वास्तव चित्र या लेखातून वाचायला मिळाले आज गावातील प्रत्येक घराची हीच आवस्था आहे आपण सर्वानी जर संयुक्त कुटुंब पद्धतीचा आपला सांस्कृतिक वारसा प्रत्येकाने सांभाळला तर यावर थोडाफार तरी परिणाम होईल असे वाटते
 
1
 
1
 

vijay d thakare - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 10:45 AM IST
vastavikata mandali geli ahe khup changala lekh ahe.
 
0
 
1
 

सु. प . नगरकर - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 10:45 AM IST
जयंत महाजन यांचा अभ्यासपूर्ण उत्तम लेख आहे. त्यात एक उल्लेख असाही असायला हवा होता . शेतकऱ्याच्या मुलाबरोबर मुली लग्न करायला तयार नाही . म्हणूनही कित्याक मुलांनी शेती असूनही शहराची वाट धरली आहे. त्यात " चूल आणि मुल हे तुझं काम नाही , खरकटी उष्टी काढणं तुझं काम नाही " असे शिक्षण मिळाल्यामुळे मुलींनी चूल सोडून दिली आहे आणि मुलंही पाळणाघरात जाऊ लागली. हे उपेक्षेने सांगत नाही. परंतु एका परिवारात राहावयाचे असेल तर थोडा फार कामाचा त्रास सोसावा लागेल हा विचार कोणी दिला नाही. म्हणून मुल आजोबा आजीकडे न ठेवता पाळणाघरात गेली.
 
6
 
2
 

महेश देशपांडे - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 10:41 AM IST
अगदी तुम्ही लिहिलात त्याच आणि तशाच परिस्थितीतून मी गेलो आहे. गावी मोठा वाडा, सणवार सगळ एकत्र करत होतो, पण सहकाराला लागलेली 'कीड' हि अनेकांच्या घरला पोखरून गेली त्यातलंच आमच एक घर. उसाच उत्पन्न मिळेल म्हणून केलेल्या उसाला भाव तर सोडाच कारखाना सुधा घेत नव्हता. आणि परत कमनशीब कि काय म्हणून 'यांच्या' राजकीय पोळ्या भाजण्यासाठी यांनी ग्रामीण भागाला जाळलं. हजारो शेतकऱ्यांचे घर दार उध्वस्त झाले, कामगारांचे हाल झाले. गावचा पाटील अन वतनदार सगळे लयाला गेले. भावकीची भांडण हि पूर्वीपासून होतीच, ती सामोपचाराने मिटतही होती, पण राजकारणाने शिरकाव केल्याने भांडण वेगळ्या वळणावर जाऊन पोहोचले. ... आता शेती तर फायद्याची नाहीच राहिली पण तरीसुद्धा जर शेतकऱ्याला आजच्या परिस्थितीत तग धरून राहायचे असेल तर 'सामुहिक शेती' हा खूप उत्तम आणि प्रभावी, काही जणांनी अनुभवलेला पर्याय आहे. गेलेली पाखरे (शहरात) परतायची अपेक्षा न करता आपण नवीन घरटे (पुढच्या पिढीला)बांधून ठेवले पाहिजे. आपण स्वतःला माफ करू शकणार नाहीत, जोपर्यंत शेतकऱ्यांचाच, पर्यायाने संपूर्ण मानव जातीचा उद्धारले नाही त
 
9
 
1
 

प्रमोद जोशी - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 10:38 AM IST
हो खरे आह एकत्र कुटूंब पद्धती चांगली होती
 
31
 
3
 

वसंत माने सौथ africa - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 10:27 AM IST
जयंत भाऊ तुमचे चिंतन खूप मोलाचे व वस्तुस्थितीला धरून सत्य आहे !
 
34
 
3
 

रवी पाटील - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 10:19 AM IST
सुंदर लेख .दारू ,गुटखा ,तंबाकू याच व्यसन सुद्धा एक कारण आणि नवतरुण पोरांना लागलेला मोबाईल चा वेड हे सुद्धा.
 
41
 
1
 

दत्तात्रय देशमुख - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 10:19 AM IST
विभक्त कुटुंबपद्धतीने आणि वाटणीने शेतीचे आणि शेतकऱ्याचे फार नुकसानच झाले आहे. संयुक्त कुटुंब पद्धतीने एकत्रित शेती करणारे फार सुखात होते.
 
1
 
1
 

नितीन बिसुरे - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 10:18 AM IST
खुप सुंदर लेख , सत्य परिस्तिथी सांगितली
 
1
 
1
 

mahadev - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 09:59 AM IST
अति सुंदर विवेचन केले आहे आपण शेती व्यवसाय आणि शेतकऱ्यांच्या सध्याच्या पारिवारिक स्थितीचे. अशा प्रकारच्या विशलेषणाने कदाचित सध्या एकत्र कुटुंब पद्धतीने राहणार्यांच्या मनाला धीर येऊन जोमाने कामाला लागतील, नियोजन करतील, तर विखूरलेल्यांच्या मनात एकत्र येऊन शेती करण्याचीही कल्पना रुजू शकेल. हा भाग झाला शेतकऱ्याच्या बाजूचा. परंतु यासाठी सध्याच्या काळाप्रमाणे/परिस्थितीप्रमाणे सरकारी बाबू आणि सरकारच्या निदर्शनास आणून विकासाची दिशा ठरवणे गरजेचे वाटते. शेती अभ्यासकांनी आणि शेती सुधारकांनी यावर आणखी जागरूक होऊन, विचार विनिमय करून शेती व्यवसायाचा विकास करून शेतकऱ्याचा तसेच देशाचा विकास घडवून आणावा. यासाठी आपल्यासारख्या वाचकांनी, जागरुकांनी अभ्यासकांना वैचारिक व शुभेच्छांचे पाठबळ द्यायला हवे. म्हणजेच मी माझे काम तर प्रामाणिकपणे केलेच पाहिजे, त्याशिवाय इतरांच्या कार्यात बाहेरून मदत, धैर्य दिले पाहिजे. तर नक्कीच भारत देशाचा शेतकरी सज्ञान, सधन होईल आणि शेती हि केवळ पोट भरण्याचे साधन न राहता शेतीचा व्यावसायिक दृष्टीकोनातून सर्वांगीण विकास साद्ध्य करता येईल.
 
30
 
1
 

sanjay - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 09:58 AM IST
Agreed with JAYANT SAHEB .
 
11
 
2
 

सिध्दनाथ - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 09:38 AM IST
एक कठोर सत्य यातून काहीतरी धडा घेऊन अप्पन सर्वांनी पुढली वाटचाल करावी शेतीचेच नाही तर मनाचे पण तुकडे पडले आहेत आम्ही हलक्या मनाची माणसे झ्हालो आहोत कोठे जाणार आहोत माहित नाही
 
26
 
1
 

Rupesh Sarode - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 09:36 AM IST
True
 
12
 
0
 

Balasaheb - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 09:31 AM IST
लेख छान आहे. काही गोष्टी करायला हव्यात: (१) सर्व वेतन आयोग आणि सर्वांची पेन्शन बंद करा. देश भिकेला लागला आहे या पगारवाढ मागणाऱ्या आणि निवृत्ती नंतर पेन्शन खाणाऱ्या लोकांमुळे. (२) माझा शेतकरी आयुष्यभर उन्हात राबतो त्याला पेन्शन आहे का? (३) पाणलोट क्षेत्र विकास हे धोरण गावकर्यांनी राबवले पाहिजे. प्रत्येक गावाने पाणी - आडवा- आणि पाणी -जिरवा कार्यक्रम घेतला पाहिजे. शेत-तळी करायला हवीत वनीकरण करायला हवे.. बोरिंग मधून पाण्याचे पुनर्भरण केले पाहिजे. (४) तसेच आधुनिक शेती (कमी पाण्यात जास्त पीक देणारी ) करावी. (५) शहरातील भांडवल शेतीकडे वळवण्यासाठी १०० ते ५०० हेक्टर शेतीचा गट करून तो रजिस्टर करावा आणि त्याला शहरी खाजगी भांडवलाची पार्टनरशिप द्यावी. कूळ कायद्याने शहरी भांडवलाचा शेतीला होणार पुरवठा थांबला. तो असा सुरूहोईल.
 
30
 
6
 

भूषण thakre - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 09:15 AM IST
खूप छान लेख, अगदी वास्तव वर्णन ........
 
13
 
3
 

धनश्री - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 09:08 AM IST
एकत्र कुटुंबाचे फायदे नाहीत असे नाही, पण हा लोकसंख्या वाढीचा प्रश्न आहे असे वाटते. पणजोबांची 50 एकर जमीन एका कुटुंबाला पुरत होती, एकत्र असले तरी कुटुंबात १०-२०च माणसे होती. पण गेल्या पिढयांमध्ये भावंडे फारच जास्त. माझ्याच पणजोबांचे आज शंभर एक वंशज आहेत. ५० एकर पिढीजात जमीन सगळ्यांना कशी पुरणार.
 
2
 
1
 

चेतन - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 08:42 AM IST
हा फार महत्वाचा विषय आहे. आतापर्यंत कुणी याचा गांभीर्याने विचारच केला नाही. यावर आणिक संशोधन झाले पाहिजे. खूप खूप धन्यवाद .
 
17
 
1
 

बिरादार - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 08:42 AM IST
विभक्त कुटुंबपद्धतीने आणि वाटणीने शेतीचे आणि शेतकऱ्याचे नुकसानच झाले त्याहून हि जास्त नुकसान शेतीमालाला रास्त भाव मिळत नाही.खर्च जास्त झालं आहे त्यामानाने मोबदला ५०% पण मिळत नाही. व्यापाऱ्यांचे मालामाल शेतकरी कर्जबाजारी झाले . शेती हा फक्त दोन वेळच जेवण देऊ शकतो जो मेहनत करतो त्यांना.नाहीतर पोट भरन पण मुशकील आहे.
 
3
 
1
 

Ravindra - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 08:41 AM IST
अगदी खरे आहे,कुळकायदा करून व कुटंुब ऩि योजन करून काहिंचे खूपच भले केले आहे
 
3
 
0
 

महेश - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 08:01 AM IST
हा काळाचा महिमा आहे !!!
 
3
 
0
 

Dinesh - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 07:30 AM IST
You have perfectly caught the situation in your writing. Divided families can never survive. I have been going through same situation. It is disheartening to see the division but morals have gone down at such a level that people became self centric. It has to stop somewhere and people should adopt the big family culture once again. Otherwise, there will be farming companies surely coming up, they will buy the land and these divided folks will do farming there.
 
2
 
1
 

vasant - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 07:03 AM IST
स्वार्थाने शेतीला गुंडाळले , प्रत्येक धंद्याला एक विशिष्ट पातळीवर गुंतवणूक लागते पण राजकारण्यांनी शेतकऱ्याला गुंडाळले मत साठी आणि मग संघटित राजकारणी व असंघटित मतदार मग काय होणार तेच झाले
 
2
 
1
 

नंदन - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 06:36 AM IST
अगदी सहमत आहे. अल्प शेतीला भवितव्य नाही.
 
3
 
2
 

सुरेश - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 06:09 AM IST
लोकसंख्येच्या हिशोबाने पूर्वी ज्या जमिनीवर ५-१० माणसांचा भार असायचा त्याच जमिनीवर ३०-४० माणसांचा भार पडत आहे. सरकार, उद्योगपती आणि अधिकाऱ्यांच्या नावाने बोटे मोडण्या आधी शेतकऱ्यांनी स्वतःचा चेहरा आरशात बघावा.
 
4
 
4
 

सुनील दातार - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 05:15 AM IST
एकत्रित कुटुंब पद्धतीत एकमेकाला मदत करतो म्हणजे काय, एक प्रकारे इन्शुरन्स असतो ना, फक्त बेनिफिट कुटुंबातलेच लोक घेतात आणि देतात. नव्या परिस्थितीत पीक विमा घेऊन काही प्रमाणात संकट कमी करता येईल.
 
18
 
1
 

Pankaj - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 05:06 AM IST
Kharay
 
10
 
1
 

SKumar - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 04:03 AM IST
अगदी बरोबर ! शेतीचे तुकडे केले गेले ,आधुनिक तंत्रज्ञानानाने शेती करण्यावर भर दिला गेला नाही , पारंपरिक पद्धतीने किंवा अकुशल कामगारांच्या मदतीने शेती केल्यामुळे नुकसान झाले. तसेच शेतीला नेहमी कनिष्ठ दर्जा दिला गेला किती मुली आहेत ज्यांना शेतकरी नवरा हवा आहे ?
 
39
 
1
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक