मुख्य पान
अमेरिका
युरोप
आशिया
ऑस्ट्रेलिया
आफ्रिका
व्हिडिओ गॅलरी

 
119
 
55
 

β हा तर थेट मराठी माणसाचा अपमानच...
- विनायक लिमये.
गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 02:12 PM IST

 

 
119
 
55
 

प्रतिक्रिया
संदीप मोरे - शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016 - 01:01 AM IST
आता सर्कस कोणती बघायची हि तर आमची मर्जी, तुमच्या सर्कशीतले खेळ आमच्या मुलांवर वाईट संस्कार करतात म्हणून बाद. देणगी देऊन नाहीतरी कुणी जातो का सर्कस बघायला? उगी अव्वाच्या सव्वा अपेक्षा ठेवू नका. मराठी साहित्याच्या आणि भाषेच्या अब्रूची लक्तरे सर्वात जास्त कुठे निघत असतील तर तुमच्या अध्यक्षीय निवडणुकीत आणि संमेलनात आणि तीदेखील जगजाहीर. गेला तो काळ साहित्यिकांनो, तेव्हा दानपात्र धुवायला घ्या अगोदर, असल्या कळकट-मातकट आणि डागाळलेल्या दानपात्रात खुद्द देवी सरस्वतीदेखील दान टाकणार नाही आणि तुम्ही लक्ष्मीची आशा करताय?
 
3
 
0
 

VIVEK - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 11:50 PM IST
Chotli mhanje kay?
 
0
 
0
 

शैलेश - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 10:17 PM IST
एक मात्र मानलं जोशी साहेबानी, बातमी व सामान्य माणसाच्या प्रतिक्रिया वाचून स्वतः येथे मत प्रदर्शन केला, त्यातून त्यांची कळवळ दिसते. ते जनतेपासून अलिप्त गेंड्याच्या कातडीचे नक्कीच नाहीत (विषयांतर करतो पण नाहीतर शिवसेना बघा, त्यांच्या भूमिकांवर किती राग आहे हे प्रतिक्रियांवरून समजते, पण त्यावर कधी विचार करणार कोण जाणे!). रागात कधी कधी माणूस बोलून जातो. त्यांचे येथील मत व लोकांच्या प्रतिक्रिया योग्यच आहेत. दोन्ही बाजूने काही तरी सकारात्मक घडावे हीच अपेक्षा.
 
3
 
0
 

निखिल - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 07:22 PM IST
जोशींच्या साहित्यिक वाटचालीकडे बघता त्यांचे हे वक्तव्य विरोधाभास दर्शवणारे वाटते, इथे सम्पूर्ण वृत्त कळत नाही.त्यांनी खरेच असे म्हटले आहे कि काही व्यक्तींच्या दानतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे याचाही विचार केला जावा. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मराठी भाषा आणि साहित्याच्या प्रचार प्रसारासाठी लोकसहभाग अत्युच्च पाहिजे. तिथे महामंडळ लोकांपर्यंत पोचण्यात अयशस्वी ठरते आहेच पण रोख रकमेची मागणी करण्याऐवजी कार्यक्रमाची रूपरेषा,राबवण्यात येणारे उपक्रम, मराठी साहित्याला त्याने मिळणारी उभारी आणि मग त्याकरता येणार साधारण खर्च आणि उप्रकमप्रमाणे लोकांना आव्हान कि हा खर्च एका व्यक्तीने/समूहाने उचलावा हि विनंती, वगैरे..जर अशी मांडणी केली तर लोक स्वतःहून पुढे येतील. महामंडळ नक्की करते काय या प्रश्नात माझ्यासारखे सामान्यजन गुरफटून जातात आणि मदतीला पुढे येत नाहीत. त्यातही यांच्या सभा, अध्यक्ष, निवडणूक त्यात होणारे अशोभनीय प्रकार, कार्यक्रम महाराष्ट्राच्या बाहेर कुठेतरी करण्याची वृत्ती- याने माझी यांच्याशी असलेली सांस्कृतिक नाळ कधीच तुटली आहे.
 
2
 
0
 

श्रीपाद भालचंद्र जोशी - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 05:03 PM IST
महामंडळावरील लेख आणि लोकांच्या प्रतिक्रिया उत्तम आणि यथार्थच आहेत.फक्त मूळ बातमीत 'दानत 'या शब्दाअगोदरचा ' अनेकांची ' हा शब्द न आल्याने हा घोळ झाल्याचे संबंधितांनाही लक्षात आणून दिले आहे.मराठी समाजातील प्रत्येकाला ते लागू नाही. असूच शकत नाही, ज्यांची दानत आहे त्यांची तर ती आहेच. त्या शिवाय सव्वा लाखही कसे उभे झाले असते? मात्र ज्यांची ती नाही त्यांचीही ती आहेच असे म्हणा असेही कोणी म्हणणार नाहीच. बाकी महामंडळ लोकांपर्यंत पोहोचण्यात कमी पडले असल्याचे वास्तव तर मी देखील सातत्याने मांडत आलो आहेच.या विषयावर असेच व दिशादर्शक मंथन अधिक व जरूर घडावे ही अपेक्षा.
 
19
 
1
 

सागर भंडारे - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 04:38 PM IST
पूर्ण सहमत आहे लेखकाशी. अगदी योग्य माहिती देणारा लेख आहे. १२ कोटी मराठी लोकांचे प्रतिनिधित्त्व नसलेल्या मंडळाला मी पण मानत नाही. केवळ काही शे लोक मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडणार हे काही साहित्याच्या जपणुकीचा मानदंड खाण्यावर घेतलेल्या लोकांच्या सुसंस्कृत पणाचे मुळात लक्षणच नव्हे. एक साधा गल्लीतला नगरसेवक निवडण्यासाठी आपण सगळ्या घरांतून मतदान घेतो आणि १२ कोटी पेक्षाही जास्त संख्येने असलेल्या मराठी बांधवांच्या भावनांचा जरा सुद्धा विचार ना करता काही शे लोक त्यांच्या भाषेच्या संमेलनाच्या अध्यक्षाची निवड करतात ??? साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांच्या यादीकडे नजर टाकल्यास कळून येते कि काय गोंधळ चालू आहे ते. लोकांच्या मनातले लेखक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न होता नेत्यांपुढे लोटांगण घालणारे दोन चार पुस्तकांचे लेखक आपल्याला अध्यक्ष म्हणून मिळतात याचे गणित मंडळाने समजावून सांगितले तर बरे होईल. तेव्हा उगाच मराठी माणसाची दानत काढण्यापेक्षा तुम्ही तुमचे काम प्रामाणिकपणे करत आहात काय? हा प्रश्न प्रामाणिकपणे स्वतःलाच विचारा आणि मग बोला.
 
13
 
0
 

Nitin देवळेकर, नूतन मराठी प्रशाला, पुणे !! - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 03:52 PM IST
मराठी माणसाने भारतासाठी पानिपतावर १-लाख बांगडीचे दान दिले आहे !! ते या कर्म दरिद्री भिकारड्या साहित्यिकांना कसे उमगणार ?? मायबाप सरकारने अनुदाने संपूर्ण बंदच करावीत !! तसेच मराठी चिवत्रपटांची करमाफी मागे घ्यावी?? त्याबदली उद्योगावरचा आणि कामगारांचा कर कमी करावा, इतुकीचं विनम्र विनंती !!
 
33
 
5
 

अभय लातूरकर - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 03:37 PM IST
नगदी रोख ९ रुपये आणि ६० नवे पैसे फक्त हि आणि इतकीच दानत दिसत्ये ..... बाराकोटी भागिले सव्वा लाख ........ ( चूक भूल देणे घेणे )
 
7
 
5
 

उ द य - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 03:37 PM IST
आम्हाला काही देणे घेणे नाही साहित्य महामंडळाशी. आम्हाला जे पुस्तक आवडते ते विकत घेतो आणि वाचतो. बस एवढाच आमचा सह्त्याशी संबध. सरकार कडून, लोकांकडून, देणग्या गोळा करा, संमेलने भरवा. हवा तो मेनू करा. भाषणे द्या. "एन्जॉय" ..........
 
23
 
0
 

पुणेरी झटका - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 03:08 PM IST
८ कोटी मराठी लोकांकडून सव्वा लाख निधी गोळा झाला म्हणजे फार झाला का?
 
11
 
13
 

चैतन्य दातखिळे - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 03:07 PM IST
पोकळ बांबूचे फटाके द्या ह्यांना.
 
24
 
4
 

एक दिल्लीकर - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 02:57 PM IST
हे महामंडळ करते काय त्याचा संपर्क पत्ता काय कुणाला माहित आहे का
 
34
 
1
 

शेरलॉक होम्स - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 02:52 PM IST
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ वर्षभर नक्की करते काय ?
 
34
 
0
 

swarup - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 02:49 PM IST
असेच लिहीत राहा
 
12
 
2
 

रामभाऊ - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 02:48 PM IST
मराठी माणसाची दान करण्याची दानतच नाही...या पेक्षा... लायकी नाही म्हणून कोणी रुपया पण भीक देत नाही असे म्हणा ....
 
42
 
4
 

मंदार दामले - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 02:47 PM IST
मुळात मराठी साहित्य महामंडळ कुठल्याही अर्थाने पुणे, मुंबई, नाशिकच्या हद्दी बाहेर जात नाही. उरलं सुरलं "अखिल भारतीय" बंगलोर, दिल्लीत संपतं. आता देणगीचा देण्याचा विषय आल्यावर तुम्हाला महाराष्ट्राची आठवण आली.
 
39
 
0
 

चैतन्य - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 02:45 PM IST
हे सगळे साहित्यिक आणि फुकटे पदाधिकारी संमेलन जवळ आल्यावर आणि संमेलन काळात किती ऐश करतात हे संमेलनाच्या पडद्यामागे जाऊन अनुभवावे....संमेलनाचा ढाचा बदलायची वेळ आली आहे. नाहीतर हा एक वार्षिक रतीब झाला आहे.
 
27
 
0
 

मिलिंद जोशी - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 02:41 PM IST
सडेतोड लिहिले आहे .महामंडळाने आत्मचिंतन करणे गरजेचे आहे
 
26
 
7
 

निशा - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 02:23 PM IST
नाम फौंडेशनला विचार, मराठी माणसाची दानत कीती आहे.
 
95
 
3
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक