मुख्य पान
अमेरिका
युरोप
आशिया
ऑस्ट्रेलिया
आफ्रिका
व्हिडिओ गॅलरी

मुख्यपान » फीचर्स » बातम्या
 
82
 
7
 

β थेट नगराध्यक्षाचा निर्णय पथ्यावर
- मनोज आवाळे
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 06:21 PM IST

 

 
82
 
7
 

प्रतिक्रिया
शिवराम गोपाळ वैद्य - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 06:55 PM IST
..5..या निकालांचा कल बघून, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वार्थी आणि दलबदलू नेते जर भाजपमध्ये किंवा शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी रीघ लावतील अशीही एक शंका आहे. त्यांना थोपवण्याचे एक मोठेच आव्हान या दोन्ही पक्षांच्या नेत्यापूढे आहे.
 
7
 
3
 

शिवराम गोपाळ वैद्य - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 06:54 PM IST
..4..या सगळ्या पार्श्वभुमीवर या निवडणुकांच्या निकालांमध्ये आपल्याला सोयीस्कर निकाल लागतीत असा या दोन्ही पक्षांचा आडाखा होता. पण राज्यातील अगदी छोट्या-छोट्या नगरांमधील जनता या दोन्ही मुद्यांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबर नाही हे निकालांनी सिद्ध केले आहे. नेमकी हीच बाब या दोन्ही पक्षांच्या नेत्यांना चिंतेत टाकणारी आहे. देशभरातील नरेंद्र मोदी नावाच्या भोवती असलेले जादुई वलय अजून कमी झालेले नाही आणि ते कमी करण्यासाठी नेमके काय करावे आणि आपण जे करू त्याला जनता साथ देईल का या दोन्ही प्रश्नांची नेमकी उत्तरे सध्या तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडे नाहीत. पूढे येऊ घातलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांना सामोरे कसे जावे हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांपूढील सर्वात मोठा कळीचा प्रश्न आहे. मात्र भाजप-शिवसेनेने शहाणपणा दाखवून महानगरपालिका आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकींमध्ये युती कायम ठेवली तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसमोर ते मोठेच आव्हान असेल यात शंका नाही. या निकालांचा कल बघून, ..5...
 
7
 
3
 

शिवराम गोपाळ वैद्य - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 06:53 PM IST
..3..याबद्दल सुद्धा जनतेच्या मनात संताप होताच. त्याचा स्पष्ट आणि दृष्य परिणाम या निवडणुकींच्या निकालावर झालेला दिसतो आहे. या निकालानंतर सर्वात दयनीय अवस्था झाली आहे ती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ! मराठा समाजाचे राखीव जागा आणि ॲट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करण्यासाठी काढलेले मोर्चे आणि दलित समाजाचे ॲट्रॉसिटी कायद्याच्या समर्थनार्थ काढलेले मोर्चे यांनी राज्याचे राजकारण ढवळून निघाले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी हे मोर्चे जणू काही भाजप-शिवसेना सरकारविरुद्धच आहेत असे भासवून अनेक मोर्चांना उपस्थितीही लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकत्याच जाहीर केलेल्या भ्रष्टाचाराचा, नकली नोटांचा, दहशतवादाचा आणि या सर्वांच्या एकमेकांशी असलेल्या "नातेसंबंधांचा" नायनाट करण्यासाठी घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयावर सुद्धा या दोन्ही पक्षांच्या वरीष्ठ नेत्यांनी अत्यंत शिवराळ भाषेत टीकेची झोडही उठवली होती. मात्र देशातील बहुसंख्य जनतेने, थोडा त्रास सहन करूनही, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मागे ठामपणे उभे राहण्याचा निश्चय केला आहे...4.
 
7
 
3
 

शिवराम गोपाळ वैद्य - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 06:53 PM IST
..२..नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांना जे काही मिळाले आहे त्याला यश म्हणावे अशी परिस्थिती नाही. विदर्भात तर काँग्रेसचा पूरताच सफाया झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रात भाजपने मुसंडी मारून राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्यात घुसखोरी केली आहे. मराठवाड़्यामध्ये मात्र भाजप आणि शिवसेनेचे दिग्गज नेते असतांनाही त्यांना आपल्या भागात अपयशाचा सामना करावा लागला. तरीही एकंदर निकाल बघता भाजप आणि शिवसेनेने जर या निवडणुका एकत्र लढवल्या असत्या तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था आणखी बिकट झाली असती. केंद्र आणि राज्यामध्ये भाजप-शिवसेनेसह एनडीए ने केलेल्या कामांबद्दल, त्यांच्या विविध योजनांबद्दल, स्वच्छ आणि पारदर्शक कारभाराबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अथक परीश्रमांबद्दल जनतेच्या मनात कमालीचे कौतुक आहे. त्याचबरोबर काही मोजकी प्रसारमाध्यमे नरेंद्र मोदींची जाणीवपूर्वक आणि विनाकारण, राईचा पर्वत करून बदनामी करत आहेत, त्यांच्या मार्गात कोलदांडे घालण्याचा अकारण प्रयत्न करणारे विरोधक, त्यांना अवास्तव प्रसिद्धी देणारी प्रसारमाध्यमे ...3....
 
8
 
3
 

शिवराम गोपाळ वैद्य - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 06:52 PM IST
वाचक मित्रानो, या विषयावर मी इ सकाळ ला एक ब्लॉग पाठवला होता. पण त्याला "अपेक्षे"प्रमाणे प्रसिद्धी दिली गेली नाही. म्हणून आता तोच लेख मी वाचकांच्या माहितीसाठी देता आहे. कृपया वाचा आणि आपला अभिप्राय कळवा. भाजपच्या यशाचे गमक := नुकत्याच झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेनेने वेगवेगळ्या निवडणुका लढवून सुद्धा या दोन्ही पक्षांना मिळालेले गगनभेदी यश डोळ्यात भरणारे आहे. त्यातल्या त्यात शिवसेनेला मिळालेले यश कौतुकास्पद आहे यात शंका नाही. याचे मुख्य कारण म्हणजे शिवसेना आणि भाजप राज्य सरकारमध्ये एकत्र असले तरीही त्यांच्या वरीष्ठ नेत्यांमध्ये गेल्या काही काळात कुरबुरी वाढल्या होत्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरात सुमारे चाळीस सभा घेतल्या होत्या. त्यांच्या सभांना जनतेने भरभरून प्रतिसादही दिला होता. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या प्रचारासाठी एकही सभा घेतली नव्हती. तरीही या दोन्ही पक्षांनी मिळवलेले यश हे विरोधी पक्षीय नेत्यांना आत्मपरीक्षण करायला लावणारे आहे यात शंका..२..
 
9
 
3
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक